शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (15:47 IST)

WhatsApp कडून 22 लाख अकाउंट बॅन, कारण जाणून घ्या

फेसबुकच्या मालकीची इन्स्टंट मेसेजिंग अॅप कंपनी व्हॉट्सअॅपने सोमवारी आपला नवीन अनुपालन अहवाल जारी केला. कंपनीने सप्टेंबर महिन्यात 22 लाख नऊ हजार भारतीय व्हॉट्सअॅप अकाऊंट्सवर बंदी घातल्याचे सांगण्यात आले आहे. अहवालानुसार, या महिन्यात कंपनीकडे 560 तक्रारी आल्या आहेत.
 
कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, एंड-टू-एंड एनक्रिप्टेड मेसेजिंग सेवांमध्ये दुरुपयोग रोखण्यात WhatsApp आघाडीवर आहे. आमच्या वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान, डेटा वैज्ञानिक आणि तज्ञांमध्ये सातत्याने गुंतवणूक केली आहे.
 
प्रवक्त्याने सांगितले की, या ग्राहक सुरक्षा अहवालात वापरकर्त्यांच्या तक्रारी आणि त्या तक्रारीवर व्हॉट्सअॅपने केलेल्या कारवाईचीही माहिती दिली आहे. यापूर्वी, व्हॉट्सअॅपने म्हटले होते की 95 टक्के निर्बंध स्वयंचलित किंवा बल्क मेसेजिंगच्या अनधिकृत वापरामुळे आहेत.
 
व्हॉट्सअॅप जगभरात दर महिन्याला सरासरी कितीतरी खाती बंद करते
अहवालानुसार, व्हॉट्सअॅप आपल्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर टाळण्यासाठी दर महिन्याला जगभरातील सरासरी 8 दशलक्ष खाती बंद करते. अनुपालन अहवालात असे म्हटले आहे की, सप्टेंबर महिन्यात कंपनीला ग्राहकांकडून आलेल्या 560 तक्रारींच्या आधारे 51 खात्यांवर कारवाई करण्यात आली.