रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 महाराष्ट्र मतदारसंघ
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2019 (15:12 IST)

कल्याण लोकसभा निवडणूक 2019

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा ठाण्याप्रमाणेच शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. २००९ ला आनंद परांजपे शिवसेनेकडून खासदार झाले. २०१४ ला आनंद परांजपे हे राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उभे राहिले.
 
मुख्य लढत : श्रीकांत शिंदे (शिवसेना) विरुद्ध बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)
या लढतीत श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. श्रीकांत शिंदे हे ४ लाख ४० हजार मतांनी निवडून आले तर राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना १ लाख ९० हजार मतं मिळाली होती. २००९ साली आनंद परांजपे हे शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आले ते २०१४ ला राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर लढले आणि त्यांचा पराभव झाला. आता शिवसेना पक्षाने जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांचे २५ वर्षीय पुत्र डॉ.श्रीकांत शिंदे आहेत.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.