शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (20:41 IST)

सहा विभागांमध्ये विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन लांबणीवर

पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांमध्ये विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. पण, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हा महोत्सव आता लांवणीवर पडला आहे. याबाबतचे ई – मले पर्यटन विभागाने सर्वांना पाठवले आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत याचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवांमध्ये नाशिक जिल्ह्यात ग्रेप हार्वेस्टिंग महोत्सव, नांदूर मधमेश्वर महोत्सव, अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा भागात काजवे महोत्सव तसेच धुळे जिल्ह्यात लळींग किल्ला महोत्सवापैकी काही लांबणीवर पडणार आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर द्राक्ष महोत्सव, सातारा जिल्ह्यात वाई महोत्सव तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा महोत्सवाचा अनुभव घेता येणार होता. तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला (सागरेश्वर) महोत्सव, रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन महोत्सव, रत्नागिरी जिल्ह्यात कातळशिल्प महोत्सव तसेच वेळास/आंजर्ले महोत्सवाचा आनंद घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार होती. पण, कोरोनामुळे ही संधी सुध्दा पर्यटकांची लांबणीवर पडली आहे.