शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2024 (19:38 IST)

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

voting
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज 7 मे रोजी मतदान झाले. एकूण अकरा मतदार संघात सायंकाळी 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान  झाले. तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदार संघावर मतदान झालं 

लातूर मध्ये 55.38 टक्के मतदान झालं. सांगलीत 52.56 टक्के, बारामतीत 45.68 टक्के, कोल्हापूर 63.71 टक्के, हातकणंगले 62.18, माढा 50, उस्मानाबाद 52.78 रायगड 50.31, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 53.75, सातारा 54.11, सोलापुरात 49.17 टक्के मतदान झालं. 
 
माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला विधानसभा क्षेत्रातील बागलवाडी येथे एका मतदाराने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून मशीन जाळण्याचा प्रयत्न केला. या मुळे काही काळ या ठिकाणी मतदान प्रक्रिया बंद पडली होती. माढा लोकसभा मतदारसंघासाठी शांततेत मतदान प्रक्रिया सुरु असताना सांगोला तालुक्यातील सुरु असताना हा प्रकार घडला. एका तरुणाने एक मराठा, लाख मराठा घोषणा करत ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून पेटवले. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. 
 
Edited By- Priya Dixit