शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: रविवार, 11 ऑगस्ट 2024 (15:04 IST)

महाविकास आघाडीचा निवडणूक प्रचार 20 ऑगस्टपासून सुरू होणार!

Nana Patole
या वर्षीच्या अखेरीस महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्व पक्ष तयारीला लागले असून महाविकास आघाडी पक्ष मध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु असून जगावाटपाचा निर्णय आता सर्वेक्षणातून होणार आहे. या साठी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने एकत्रितपणे एक नोडल एजन्सी नेमली आहे. जे लवकरच राज्यातील तिन्ही पक्षांचे सर्वेक्षण सुरू करणार आहे. 

जागावाटपात होणारा वाद टाळता यावा यासाठी तिन्ही पक्षांनी हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.तिन्ही पक्षांनी या एजन्सीला 20 ऑगस्टपूर्वी सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे जेणेकरून जागा वाटपात विलंब होऊ नये.
 
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त 20 ऑगस्ट रोजी मुंबईत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

या सभेसाठी देशभरातून कार्यकर्ते मुंबई गाठणार आहेत. या कार्यक्रमात महाविकास आघाडीच्या पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात येणार असून, त्यासाठी काँग्रेस नेत्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवले आहे. या कार्यक्रमाला लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही उपस्थित राहणार आहेत.
 
महाविकास आघाडीतील विधानसभेच्या जागांचे वाटप गुणवत्तेवरच होईल, असे तिन्ही पक्षांचे नेते वेळोवेळी सांगत असून आता या पक्षांनी गुणवत्तेचे निकष लावण्यासाठी नोडल एजन्सी नेमली आहे.जी महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांचे सर्वेक्षण करेल. जे लवकरच राज्यातील तिन्ही पक्षांचे सर्वेक्षण सुरू करणार 
जागावाटपात होणारा वाद टाळता यावा यासाठी तिन्ही पक्षांनी हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोणत्या पक्षाला राज्यात किती जागांवर निवडणूक जिंकता येईल, याची माहिती या सर्वेक्षणातून मिळणार आहे. कोणत्या पक्षाचा उमेदवार जिंकू शकतो? या सर्वेक्षणाच्या आधारे तिन्ही पक्षांमध्ये जागावाटप करण्यात येणार. 
Edited by - Priya Dixit