शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपात प्रवेश

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला परत धक्का बसला आहे.  सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून,त्यांनी  विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. 

शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहेत असे त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले.  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश करावा असा प्रस्ताव कार्यकर्त्यांनी मांडला बैठकीत ठेवला होता.  प्रवेशाचा सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांच्या विचाराचाच निर्णय घेणार आहेत. एकप्रकारे त्यांनी  भाजपात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेतच दिले आहेत.शिवेंद्रसिंहराजेंनी राजीनामा दिल्यावर सांगितले  की, “ माझ्या  मतदारसंघातील कामं झालीच नाहीत, त्यामुळे  आपण आमदारकीचा राजीनामा दिला. माझ्या  म तदारसंघातील लोकांचे प्रश्न सुटणं आधी  महत्त्वाचं असून, संध्याकाळी कार्यकर्त्यांची बैठक  होत आहे.

भाजपासोबत जाणं जास्त योग्य होईल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे”. तर आपण शरद पवारांचा शब्द डावलत नसल्याचंही सांगितलं तसंच मी भाजपाकडे कोणतीही मागणी केलेली नाही. यामुळे राष्ट्रवादीला मोठा राजकीय धक्का बसला असून विधानसभेची त्यांची जागा हातातून गेल्याचे दिसून येतंय.