रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 22 एप्रिल 2021 (11:22 IST)

Tanning in Summer बर्फाचा एक तुकडा दूर करेल टॅनिंगची समस्या

उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या सामान्य बाब आहे. तरी टॅनिंगच्या समस्येमुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. ही समस्या सामान्य असली तरी या समस्येकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नये. 
 
टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी अनेकदा महागड्या केमिकल असलेल्या क्रीम वापरण्याची वेळ येते परंतू ही चूक न करता सरळ बर्फाने टॅनिंग दूर करता येते. फ्रूट स्क्रब, स्किन लोशन या सर्वांपेक्षा बर्फ अधिक प्रभावी आाहे. जाणून घ्या कशा प्रकारे बर्फाने स्किन टॅन दूर करण्यास मदत होते.
 
एक बर्फाचा तुकडा घ्यावा. याने चेहर्‍यावर मसाज करावी. काही दिवस सतत हा उपाय अमलात आणा याने टॅनिंगने सुटका मिळेल. चेहर्‍यावर टॅनिंग असल्यास सुती कपड्यात बर्फ ठेवा. मग चेहर्‍यावर हलक्या हाताने मसाज करा. याने हाताला आणि चेहर्‍यावर जास्त थंडपणा देखील जाणवणार नाही. याच प्रकारे शरीराच्या प्रभावित भागांवर बर्फ चोळता येईल.
 
बर्फाने त्वचेवरील टॅनिंगची समस्या तर दूर होईलच सोबतच तेलकट त्वचेपासून सुटका मिळेल. उन्हाळ्यात त्वचेवर घाण-धूळ चिटकत असल्यामुळे पिं‍पल्सची समस्या देखील वाढते त्यापासून देखील आराम होईल. बफार्न मसाज केल्याने त्वचेवरील रोमछिद्र आक्रसून जातात ज्याने त्वचेवरील ऑयलीचे प्रमाण कमी होऊ लागतं.
 
घामोळ्या दूर करण्यासाठी देखील बर्फाची मसाज योग्य ठरेल. तसेच डोळ्याखाली डार्क सर्कल्सपासून सुटका मिळविण्यासाठी देखील बर्फाची हलुवार मसाज करावी.