शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (22:57 IST)

पगारदारांसाठी मोठी बातमी, आता PF खात्यावरही लागणार कर

आपण नोकरी करत असाल आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) खाते असल्यास आपल्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पगारदार लोकांसाठी, भविष्य निर्वाह निधीची रक्कम ही त्यांची आयुष्यभराची कमाई असते. जोपर्यंत आपण नोकरी करता, आपल्या पगाराचा काही भाग दरमहा भविष्य निर्वाह निधीत जमा होतो आणि आपण सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या कडे मोठी रक्कम असते. या पैशातून आपण आपला वृद्धापकाळ आरामात घालवू शकता. पण वेळोवेळी EPF च्या नियमांमध्ये काही बदल केले जातात, जे आपल्यासाठी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. आता पीएफ खात्याच्या नियमांमध्ये काही नवीन बदल होणार आहेत. वास्तविक, 1 एप्रिल 2022 पासून, विद्यमान पीएफ खाते दोन भागांमध्ये विभागले जाऊ शकते, ज्यावर कर देखील आकारला जाईल. नवीन नियम काय आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल ते जाणून घ्या.
 
* या पीएफ खात्यांवर कर आकारला जाईल
सरकारने आता पीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, सरकारने नवीन आयकर नियम अधिसूचित केले होते, ज्या अंतर्गत आता पीएफ खाती दोन भागात विभागली जातील. जर तुमचा दरमहा जमा केलेला पीएफ एका वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर मिळणारे व्याज आता आयकराच्या कक्षेत येईल. 
 
* या करदात्यांना नवीन नियम लागू नसणार -
लहान आणि मध्यमवर्गीय करदात्यांना नवीन नियमाचा फटका बसणार नाही. याचा प्रामुख्याने उच्च उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. म्हणजेच तुमचा पगार कमी किंवा सरासरी असेल, तर आपल्याला या नवीन नियमात काहीही फरक पडणार नाही. 
 
* नवीन पीएफ नियमांची खास वैशिष्ट्ये
विद्यमान पीएफ खाते दोन भागांमध्ये विभागले जाईल म्हणजे टॅक्सेबल आणि नॉन टॅक्सेबल काँट्रीब्युशन अकाउंट्स मध्ये विभागले जातील. CBDT नुसार, नॉन टॅक्सेबल खात्यात त्यांचे क्लोजिंग अकाउंट मध्ये समाविष्ट असणार, कारण त्याची तारीख 31 मार्च 2021 असते.
 
नवीन पीएफ नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होऊ शकतात. करपात्र व्याजाच्या गणनेसाठी विद्यमान पीएफ खात्यामध्ये दोन स्वतंत्र खाती देखील तयार केली जातील. कर्मचार्‍यांच्या वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त योगदान असलेल्या पीएफ उत्पन्नावर नवीन कर लागू होईल.