सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 31 जुलै 2019 (14:17 IST)

IRCTC प्रमाणे मेक माय ट्रीप आणि यात्रा सरकारचे आधिकारिक एजंट बनू शकतात

मेक माय ट्रीप आणि यात्रा सारखे ऑनलाईन प्रायवेट ट्रव्हल पोर्टल लवकरच सरकारचे आधिकारिक एजंट बनू शकतात. सरकारचा वाणिज्य विभाग या प्रकाराच्या थर्ड पार्टी ट्रव्हल कंपन्यांसोबत तिकिटावर सूट आणि रद्द तिकिटांच्या रीफंडाबद्दल चर्चा करत आहे.
 
एका अधिकाऱ्याने दिलेल्या वृत्तानुसार ते यात्रा आणि मेक माय ट्रीप सारख्या थर्ड पार्टी कंपन्यांकडून गव्हर्नमेंट इ-मार्केटप्लेस (GeM) च्या माध्यमाने काम करण्यासाठी चर्चा करत आहे.
 
सांगायचे झाले तर सध्या अशोक ट्रव्हल आणि आयआरसीटीसी सारख्या एजन्सी सरकारसोबत काम करत आहे. तसेच सरकारी फ्लाईट तिकिटांचे बुकिंग विमानन कंपन्यांच्या साईटवरून होतात.
 
या प्रकरणात यात्राच्या प्रवक्ते ने म्हटले, 'आमची प्राथमिकता ग्राहकांना जास्तीतजास्त सूट द्यावी आणि केंसल तिकिटांवर उचित रिफंड मिळवून देणे. आम्ही सरकारसोबत सध्या सुरुवातीची चर्चा करत आहे आणि या भागीदारीबद्दल जास्त काही म्हणू शकत नाही.' तसेच मेक माय ट्रीपच्या प्रवक्तेने सध्या कुठली ही टिपप्णी करण्यास नकार दिला आहे.