शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (15:05 IST)

रिफायनरीच्या जागा पाहणीसाठी केंद्रीय समिती राजापुरात येणार

राजापुरा तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्याचे पर्यावरणमंत्री नामदार आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग दौऱयाप्रसंगी सूचक वक्तव्य केल्यानंतर रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. राजापूर तालुका व कोकणच्या औद्योगिक विकासासाठी आग्रही असलेल्या ओम चैतन्य ट्रस्ट तसेच अखिल भारतीय भंडारी महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱयांनी मंगळवारी रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने उद्योगमंत्री नामदार सुभाष देसाई यांची भेट घेतली. 
 
यावेळी देसाई यांनी लवकरच केंद्रीय पथक जागा पाहणीसाठी राजापुरात येईल. त्यानंतर आपण दौरा करू, अशी माहिती दिल्याचे महासंघाच्या पदाधिकाऱयांनी सांगितले. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प राजापुरातच होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
 
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत मागील काही दिवसांमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. रिफायनरी प्रकल्पासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाला ना हरकत दिल्याचे वृत्त ताजे असतानाच आदित्य ठाकरे यांनी मालवणच्या दौऱयात रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मकतेने विचार केला जात असल्याचे स्पष्ट केले.