शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जानेवारी 2020 (12:53 IST)

Uber Eats बंद होणार, Zomato ने व्यवसाय विकत घेतला

ऑनलाइन फूड डिलिव्हरी सर्व्हिस देणार्‍या ‘Zomato’ कंपनीने ‘Uber Eats India’ या प्रतिस्पर्धी कंपनीला विकत घेतले आहे. या व्यवहारानुसार, झोमॅटोनं उबर इट्सचा भारतीय व्यवसाय सुमारे 35 कोटी डॉलर अर्थात 2485 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. बऱ्याच काळापासून याची चर्चाही सुरु होती.
 
कॅब सेवा पुरवणारी प्रसिद्ध कंपनी उबरचा ऑनलाईन फूड सर्व्हिसमध्ये भारतात चांगला व्यवसाय होत नव्हता, त्यामुळेच कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे झोमॅटोमध्ये आता उबरचा केवळ 9.99 टक्के हिस्साच असणार आहे. 
 
उबर जगातील इतर देशांमध्ये आपली सेवा कायम ठेवणार आहे. कंपनीचे हे अधिग्रहण केवळ भारतातील उबर इट्ससाठीच आहे. कंपनीप्रमाणे मार्केटमध्ये शीर्ष क्रमांकावर नसल्याने कंपनी तो व्यसवसाय सोडते. कंपनीच्या या धोरणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
कंपनीप्रमाणे हा व्यवहार केवळ उबर इट्ससाठी असून कॅब सेवेसाठी नाही म्हणून कंपनी कॅब सर्व्हिस देणार.
 
सूत्रांप्रमाणे भारतात उबर इट्सच्या कर्मचाऱ्यांना झोमॅटो आपल्यामध्ये सामावून घेणार नाही. त्यामुळे उबर इट्सचे सुमारे 100 एक्झेक्युटिव्हज उबरच्या इतर कंपन्यांमध्ये सामावून घेतले जातील किंवा त्यांना कॉस्ट कटिंगचा सामना करावा लागेल. परंतू यावर दोन्ही कंपन्यांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.