रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (15:00 IST)

Hardik-Akshaya wedding: राणादा आणि अंजलीबाईंना हळद लागली लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात

तुझ्यात जीव रंगला फेम राणादा म्हणजे हार्दिक जोशी आणि अंजली बाई म्हणजे अक्षया देवधर हे लवकरचं वैवाहिक बंधनात अडकणार आहेत. दोघांचा घरी लग्नाची जय्यत तयारी सुरु झाली असून त्यांचा हळदीचा सोहळा पार पडला आहे. हळदीच्या समारंभाचे काही फोटो राणादा म्हणजे हार्दिक ने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे .तसेच या समारंभाचे फोटो हार्दिकच्या जवळचा मित्र अमोल नाईक याने शेअर  केले आहे. त्याने या कार्यक्रमाचा व्हिडीओ देखील शेअर केला असून त्यात त्याचे कुटुंबीय आणि मित्र आहे. 
हार्दिकच्या  घरातच डेकोरेशन केले आहे. हार्दिकने हळदीसाठी पांढरा रंगाचा सदरा  घातला आहे आणि मुंडावळ्या लावल्या हे.हार्दिक अक्षय हळद समारंभ असे पोस्टर देखील लावलेले दिसत आहे.  

Edited By- Priya Dixit