सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 31 जुलै 2019 (11:46 IST)

नेहा शितोळेची विजयाकडे कूच

धाकड गर्ल, टास्क क्वीन असे बिरूद मिरवत, बिगबाॅस मराठी सीजन २ च्या ट्राॅफीकडे नेहा आता कूच करणार आहे. घरातील आतापर्यंतचे प्रत्येक टास्क चांगल्या पद्धतीने खेळल्याबद्दल नेहाचे कित्येकदा होस्ट मांजरेकर सरांकडून कौतुक झाले आहे. शिवाय, घरच्या सदस्यांबरोबरचे तिचे संबंध देखील चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या विरोधकांसमोर ती आपली बाजू परखडपणे मांडताना दिसून येत असून, तिच्यातली सर्वसमावेशकता प्रेक्षकांना आवडत असल्याचे पहायला मिळते आहे. नुकत्याच झालेल्या विकेंडला, तिचा खास मित्र माधव देवचके घराबाहेर पडला. आतापर्यंत घरात ६० दिवस एकमेकांसोबत घालवल्यानंतर माधवच्या एक्झिटमुळे नेहाला रडू कोसळले होते. मात्र, त्या दुखातून नेहाने स्वतःला सावरत आणखीन जोमाने खेळायचा निश्चय केला आहे. तसे तिने कॅमे-यासमोर १०० दिवस पुर्ण करून दाखवणार असल्याचा निश्चय माधवला बोलून दाखवला.

या व्यतिरिक्त, घरात बिचुकले परत आल्यामुळे अनेक घडामोडींना वेग आला आहे, पहिल्या दिवसांपासूनच या दोघांचे संबंध ईतके काही खास नव्हते. परंतु त्यानंतर या दोघांची मैत्रीदेखील झाली होती. मात्र खेळ अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याकारणामुळे प्रत्येकजण आपापला खेळ खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. नेहा देखील त्याला अपवाद नाही. तसेच लवकरच बिगबाॅसच्या घरात फॅमिली विक टास्क सुरू होत आहे, त्यामुळे आपल्या धाकड गर्लच्या कुटुंबातील एक सदस्य तिला भेटावयास जाणार आहे. अर्थात तो सदस्य म्हणजे, तिचा नवरा नचिकेत असेल असा अंदाज आहे. आणि ते जर शक्य झाल्यास नचिकेतच्या भेटीनंतर तिला विनर बनण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही, हे नक्की!