रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 25 मे 2017 (08:46 IST)

सागरिका - झहीर खान घाटगेचा झाला साखरपुडा

अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटपटू झहीर खान यांचा अखेर साखरपुडा मंगळवारी मुंबईत पार पडला. परंतु, या सोहळ्यात सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बनलेते विराट आणि अनुष्का…या सोहळ्याला विराट आणि अनुष्का यांनी हातात हात घालून हजेरी लावल्यामुळे त्या दोघांकडेच सगळ्यांचे लक्ष लागले होते.  काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अनुष्का साखरपुड्याला आली होती, तर विराटने पांढरा शर्ट आणि काळी ट्राऊझर घातली होती. गेल्यावर्षी युवराजच्या रिसेप्शनमध्येही विराट-अनुष्का शोस्टॉपर ठरले होते. त्यानंतर झहीर-सागरिकाच्या साखरपुड्यातही त्यांच्याकडेच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. गेल्या महिन्यात सागरिका-झहीर यांनी ट्विटरवरुन आपल्या एंगेजमेंटची घोषणा केली होती. त्यानंतर मंगळवारी दोघांचा साग्रसंगीत साखरपुडा पार पडला. या सोहळ्याला सचिन तेंडुलकर आणि पत्नी अंजली, युवराज सिंग, रवीना टंडन आणि पती अनिल थडानी, रोहित शर्मा आणि पत्नी रितीका, मंदिरा बेदी, प्राची देसाई यांनी हजेरी लावली.
 
झहीर खूप आधीपासून एंगेजमेंटची तयारी करत होता. मला अजिबात याबाबत कल्पना नव्हती. त्याने माझ्यासाठी इतकी सुंदर अंगठी घेतली आहे, याची पुसटशीही आयडिया नव्हती. मी त्या क्षणाचे वर्णनही करु शकत नाही. हा अनुभव आम्हा दोघांसाठी नेहमीच खास असेल. अशा भावना सागरिकाने व्यक्त केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेणारा झहीर खान मागील आठ-नऊ महिन्यांपासून सागरिकासोबत डेटिंग करत आहे. एका कॉमन फ्रेण्डद्वारे या दोघांची भेट झाली आणि काही काळातच ते दोघे जवळ आले. झहीर आणि सागरिका अनेक कार्यक्रमात आणि पार्टीमध्ये एकमेकांसोबत दिसतात. आता ते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.