रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 19 मार्च 2024 (11:54 IST)

विजेतेपदानंतर आरसीबीवर पैशांचा पाऊस

दिल्ली कॅपिटल्सला मिळाले पाकिस्तान सुपर लीगपेक्षाही जास्त पैसे महिला प्रीमियर लीगच्या दुस-या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दिल्लीचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले आहे. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर पैशांचा पाऊस पडला आहे. तसेच पराभवानंतर देखील दिल्ली कॅपिटल्स संघाला पाकिस्तान सुपर लीगपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे.
 
याबरोबरच, दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात बेंगळुरूने ८ विकेट्सने विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले आहे. त्यामुळे दिल्लीला सलग दुस-या हंगामात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. तर डब्ल्युपीएल २०२४ स्पर्धा जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला ६कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले, तसेच उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्स संघाला ३ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
 
गेल्यावर्षी डब्ल्युपीएल २०२३ मध्येही विजेत्या मुंबई इंडियन्सलाही ६ कोटी रुपये मिळाले होते, तर दिल्ली कॅपिटल्सलाही ३ कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र सध्या चालू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग २०२४ स्पर्धेच्या विजेत्याला यंदा १२० मिलियन पाकिस्तानी रुपये म्हणजेच भारतीय चलनानुसार ३.५कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच उपविजेत्याला भारतीय चलनानुसार १.४ कोटी रुपये मिळणार आहेत.

Edited By- Ratnadeep ranshoor