शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019 (15:53 IST)

टिक टॉक चे पुण्यात फिल्म फेस्टिवल

सध्या लहान ते मोठे अश्या सर्व वयोगटातील लोकांना Tik Tok ने वेड लावलं आहे. आज सर्वांकडे स्मार्टफोन आहे आणि Tik Tok या अॅपचे अनेक चाहतेही आहेत. Tik Tok मुळे अनेकामध्ये लपलेला कलाकार मग तो कसाही असेल तो बाहेर येऊ लागला असून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी सुद्धा मिळवत आहेत. तर याच टिक टॉक मुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता यात पुढे जात पुण्यातही Tik Tok फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे.
 
काही दिवसांपूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने Tik Tok या अॅपवर संपूर्ण  बंदी घातली होती. परंतु काही दिवसांनी ती हटवण्यात आली. Tik Tok वर दररोज लाखो व्हिडीओ अपलोड होत असतात. तसंच हे व्हिडीओ सोशल मीडिया ट्रेंडही बनत असतात. आता असेच व्हिडीओ तयार करणाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुण्यात आयोजित होणाऱ्या या फेस्टिव्हलसाठी 20 ऑगस्टपर्यंत व्हिडीओ पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलचे पोस्टर सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बेस्ट कॉमेडी, बेस्ट इन प्रँक आणि सोशल अवेअरनेससारख्या कॅटेगरीदेखील आहेत. ज्युरी हे व्हिडीओ पाहणार असून विजेत्यांना 33 हजार 333 रूपयांचे पारितोषिक देण्यात येणआर आहे.हे फेस्टिवल अधिकृत टिक टॉक कंपनीने घेतले नसून एक खासगी संस्था घेत आहे, याची नोंद वाचकांनी घ्यावी हे फक्त वृत्त असून याबद्दल निर्णय स्वतः यात सहभाग नोंदवत असलेल्यानी घ्यावा.