सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (10:06 IST)

UPPSC PCS Recruitment 2021 : 416 पदांसाठी भरती

उत्तर प्रदेश लोक सेवा आयोगाने पीसीएस भरतीसाठी नोटिफिकेशन काढले आहे ज्यानुसार 416 पदांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार कंबाइंट स्टेट/ अपर सबॉर्डिनेट सर्व्हिसेज परीक्षा 2021 आणि सहाय्यक वन संरक्षक रेंज फॉरेस्ट ऑफिसर सेवा परीक्षा 2021 साठी ऑनलाइन अर्ज करु शकतात.
 
अर्ज करण्याची तारीख 5 फेब्रुवारी ते 5 मार्च 2021 आहे. अर्ज करणार्‍यांना संयुकत राज्य/ अपर अधीनस्थ सेवा परीक्षा 2021 यात उपस्थित राहवं लागेल आणि क्वालिफाय झाल्यानंतर सहाय्यक पर्यवेक्षक/ रेंज वन अधिकारी सेवा मुख्य परीक्षा आणि साक्षात्कारसाठी उपस्थित राहू शकतील.
 
अनारक्षित आणि ओबीसी कॅटगरीच्या उमेदवारांसाठी एप्लिकेशन फी 125 रुपये आणि एसी/ एसटी कॅटगरीसाठी 65 रुपये आणि पीएच उमेदवारांसाठी 25 रुपये आहे. आवेदनासाठी उमेदवारांचे वय 21 वर्षाहून अधिक आणि 40 वर्षापेक्षा कमी असावे. आरक्षित कॅटगरीच्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा यात सूट आहे.
 
नोटिफिकेशन येथे बघा.