शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (15:42 IST)

कोरोनाचा दुष्परिणाम, जोडप्यांमध्ये वाढलेली आक्रमकता आणि हिंसाचाराची प्रकरणे

कोरोना महामारीनंतर लोकांचे जीवन अनेक प्रकारे बदलले आहे.काही लोक त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक झाले आहेत, तर या आजाराने मानसिक स्थितीवरही वाईट परिणाम केला आहे.एका संशोधनात म्हटले आहे की कोरोना महामारीमुळे जोडप्यांमध्ये रागाची भावना खूप वाढली आहे.अगदी काही लोकांना इतका तणाव आला की ते वस्तू फेकू आणि तोडू लागले आहेत.
 
जोडप्यांमध्ये वाढलेली आक्रमकता आणि हिंसाचाराची प्रकरणे
एका नवीन अभ्यासातून असे समोर आले आहे की साथीच्या काळात कोविड निर्बंधांमुळे जोडप्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक आक्रमकता वाढली आहे.कोविड साथीच्या आजारामुळे काही जोडपे 6 ते 8 पट अधिक आक्रमकपणे वागतात.तर,एकाच छताखाली राहणाऱ्या जोडप्यांमध्ये शारीरिक आक्रमकता दरवर्षी 2 ते 15% पर्यंत वाढली आहे आणि मानसिक आक्रमकता दरवर्षी 16 ते 96% पर्यंत वाढली आहे.
 
नॉन-अल्कोहोलिक जोडप्यांनाही याचा फटका बसला
सहभागींना कोविड -19 ताण, त्यांच्या जोडीदाराकडे शारीरिक आणि मानसिक आक्रमकता आणि वारंवार मद्यपान करण्याबद्दल विचारले गेले.असे दिसून आले की कोविडमुळे खूप तणाव निर्माण झाला आहे,ज्यामुळे मद्यपान आणि आक्रमकता देखील वाढली आहे.आकडेवारी दर्शवते की नैसर्गिक आपत्तींनंतर लोक एकाएकी प्रचंड तणावाखाली होते.केवळ मद्यपान करणारेच नव्हे तर मद्यपान न करणारे देखील कोविड दरम्यान तणावामुळे प्रभावित झाले.
 
शारीरिकआक्रमणामुळे हिंसा वाढली 
संशोधन म्हणते की जोडप्यांमध्ये शारीरिक आक्रमणाची 2 प्रकरणे वार्षिक होती जी लॉकडाऊनमध्ये वाढून 15 झाली आहे. यात वस्तुंना फेकणे,मारणे, वस्तूंची तोडफोड  करणे यांचाही समावेश आहे.साथीच्या रोगानंतर, लोकांच्या प्रतिक्रियेत झपाट्याने बदल झाला आहे, त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ताण येणं आहे.