शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जुलै 2022 (21:15 IST)

प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठी कारवाई, मुंबईतील राहतं घर केलं जप्त

/praful_patel
राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने पटेल यांचं मुंबईतील राहतं घर जप्त केलं आहे. पटेल यांच्या इमारतीतील 2 मजले जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील वरळी इथे प्रफुल्ल पटेल यांची सीजे हाऊस नावाची मोठी इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामाआधी त्याजागी छोटी इमारत होती. ती इमारत इक्बाल मिर्चीच्या ताब्यात असल्याचा आरोप आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीकडून या इमारतीची पुनर्बांधणी करण्यात आली होती .या पुनर्बांधणीच्या मोबदल्यात पटेल यांनी मिर्चीला रक्कम आणि जागा दिली असल्याचं इडीने सांगितलंय. या सर्व व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे. या प्रकरणात इडीकडून सर्व तपास सुरु आहे. ईडीने पटेल यांच्या विरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
प्रफुल्ल पटेल यांच्यावरील कारवाई राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मनाला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय जवळचे, निकटवर्तीय म्हणून प्रफुल्ल पटेल यांची ओळख आहे. पटेल यांची ईडीकडून दोनवेळा चौकशी केली त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीला ज्या पद्धतीने त्यांच्या संपत्तीच्या, मालमत्तीच्या व्यवहाराच्या नोदींविषयी अनियमितता आढळली होती. याचमुळे प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली.