शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: नवी मुंबई , सोमवार, 16 मे 2022 (21:34 IST)

केतकीच्या घरातून पोलिसांनी केला लॅपटॉप आणि मोबाईल जप्त

ठाणे पोलीस अभिनेत्री केतकी चितळेला  घेऊन तिच्या कळंबोली येथील घरी पोहोचले. केतकीच्या घरातून लॅपटॉप आणि इतर कागदपत्र घेण्यासाठी पोलीस तिच्या घरी दाखल झाले होते. लॅपटॉपमध्ये आणखी काही आक्षेपार्ह माहिती मिळतेय का याची तपासणी पोलीस करत आहेत. त्यानंतर तीला पुन्हा ठाणे पोलीस स्टेशनला आणलं . केतकी अटक करताना पोलिसांनी आधीच तिचा मोबाईल जप्त केला होता. आज दुपारी तिचा लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला आहे. गुन्हे शाखा युनिट 1 कडून जप्त करण्यात आलेल्या साहित्याची तपासणी करत आहे.
 
नेरुळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
 
 शरद पवार यांच्यावर केलेल्या अपमानकारक पोष्ट संदर्भात केतकी चितळे हिच्यावर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या सुमीत्रा पवार यांनी केला असून,153A,500,501,505(2)अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. याची पुढील कारवाई नेरूळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करणार आहेत. मात्र आता राज्यात अनेक ठिकाणी केतकी चितळे हिच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. केतकीच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं. राज्यभरातून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संताप व्यक्त करत केतकीवर कारवाईची मागणी केली जात आहे.  
 
केतकीचे समर्थन करणाऱ्यावरही पनवेलमध्ये गुन्हा दाखल
 
दरम्यान केतकीला समर्थन देणा-या किरण इनामदारवरही पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याने तिच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली होती. मात्र त्याने अवघ्या काही तासांमध्ये ती दिलीट सुद्धा केली. यामुळे पनवेलमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक होत पोलीस स्टेशन गाठले . या प्रकरणी पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, पनवेल जिल्हा महिला कार्याध्यक्ष शशिकला सिंग, युवक प्रदेश सचिव संदीप म्हात्रे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
दरम्यान, केतकी चितळेविरोधात 15 ठिकाणी गुन्हा दाखल झालाय. उस्मानाबाद, पारनेरनंतर आज नवी मुंबईतही केतकीविरोधात गुन्हा दाखल झालाय. शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट केल्याने केतकीविरोधात गुन्हे दाखल होत आहेत. राज्यातील गोरेगाव, पवई, भोईवाडा, कळवा, नेरूळ, पुणे, पिंपरी चिंचवड देहूरोड, नाशिक, धुळे, अकोला, अमरावती, जळगाव, सातारा, उस्मानाबाद, पारनेर पोलीस ठाण्यात केतकी चितळे विरोधात एफआयआर नोंदवलेत.