शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 25 जानेवारी 2023 (23:07 IST)

पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रात कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

padma puraskar
यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुलायम सिंह यादव, झाकीर हुसैन यांना पद्मविभूषण, एस एल भैरप्पा, कुमार मंगलम बिर्ला, सुधा मूर्तींना , सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
 
भारताच्या गृह मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक काढून या पुरस्कारांची माहिती प्रसार माध्यमांना दिली.
 
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. त्यानुसार, यंदाच्या वर्षीही आज रात्री उशिरा पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये एकूण 106 जणांना स्थान मिळालं आहे.
 
यामध्ये 6 जणांना पद्मविभूषण, 9 जणांना पद्मभूषण तर 91 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
पद्म पुरस्कार हे भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन विभागांमध्ये हे पुरस्कार देण्यात येत असतात. कला, समाजकार्य, उद्योग, विज्ञान, वैद्यकीय, शिक्षण, साहित्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये हे पुरस्कार दिले जातात.
 
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा होते. त्यानंतर मार्च/एप्रिल महिन्यात हे पुरस्कार मान्यवरांना प्रत्यक्षात प्रदान करण्यात येतो. यासाठी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनामध्ये एक सोहळा पार पडतो. या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते मान्यवरांना हे पुरस्कार देण्यात येतात.
 
यंदाच्या यादीत 19 महिला पुरस्कार्थींचा समावेश आहे. तर अनिवासी भारतीय/परदेशी नागरिक असलेल्या 2 व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात येणार आहे. तसंच पुरस्कार घोषित झालेल्यांपैकी 7 जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येणार आहे.  
 
महाराष्ट्रातील 12 मान्यवर
महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या एकूण 12 मान्यवरांची पद्म पुरस्कारांमध्ये वर्णी लागली आहे.
 
त्यामध्ये तबला वादक झाकीर हुसैन यांना कला विभागातील कामासाठी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे.
 
पद्मभूषण पुरस्कारांच्या तीन मानकऱ्यांपैकी कुमार मंगलम बिर्ला यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात, दीपक धर यांना विज्ञान आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात, तर गायिका सुमन कल्याणपूर यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार देण्यात येईल.
 
पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींमध्ये महाराष्ट्रातील 8 नावे आहेत.
 
भिकू रामजी इदाते (समाजकार्य),
राकेश राधेश्याम झुनझुनवाला (मरणोत्तर) (व्यापार आणि उद्योग),
परशुराम कोमाजी खुने (कला),
प्रभाकर भानुदास मांडे (साहित्य आणि शिक्षण),
गजानन जगन्नाथ माने (समाज कार्य), रमेश पतंगे (साहित्य आणि शिक्षण),
रवीना टंडन (कला),
कूमी नरिमन वाडिया (कला)
 
पद्म पुरस्कार 2023 संपूर्ण यादी
पद्मविभूषण
 
1. बाळकृष्ण दोशी
(मरणोत्तर) इतर - आर्किटेक्चर - गुजरात
2. झाकीर हुसेन - कला - महाराष्ट्र
3. एस एम कृष्णा - पब्लिक अफेयर्स - कर्नाटक
4. दिलीप महालनाबीस (मरणोत्तर) - चिकित्सा - पश्चिम बंगाल
5. श्रीनिवास वरधन - विज्ञान आणि अभियांत्रिकी - युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
6. मुलायम सिंह यादव (मरणोत्तर) - पब्लिक अफेअर्स - उत्तर प्रदेश
 
पद्मभूषण
7. एस एल भ्यरप्पा - साहित्य आणि शिक्षण - कर्नाटक
8. कुमार मंगलम बिर्ला - व्यापार आणि उद्योग - महाराष्ट्र
9. दीपक धर - विज्ञान आणि अभियांत्रिकी - महाराष्ट्र
10. वाणी जयराम - कला - तामिळनाडू
11. स्वामी चिन्ना जेयर - इतर - अध्यात्म - तेलंगणा
12. सुमन कल्याणपूर - कला - महाराष्ट्र
13. कपिल कपूर - साहित्य आणि शिक्षण - दिल्ली
14. सुधा मूर्ती - सामाजिक कार्य - कर्नाटक
15. कमलेश डी पटेल - इतर - अध्यात्म - तेलंगणा
पद्मश्री
16. डॉ. सुकाम आचार्य - इतर - अध्यात्म - हरियाणा
17. जोधैयाबाई बैगा - कला - मध्य प्रदेश
18. प्रेमजीत बारिया - कला - दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव
19. उषा बारले - कला - छत्तीसगड
20. मुनीश्वर चांदडावार - औषध - मध्य प्रदेश
21. हेमंत चौहान - कला - गुजरात
22. भानुभाई चित्रा - कला - गुजरात
23. हेमोप्रोवा चुटिया - कला - आसाम
24. नरेंद्रचंद्र देबबर्मा (मरणोत्तर) - सार्वजनिक व्यवहार त्रिपुरा
25 . सुभद्रा देवी - कला - बिहार
26. खादर वल्ली दुडेकुला - विज्ञान आणि अभियांत्रिकी - कर्नाटक
27. हेमचंद्र गोस्वामी - कला - आसाम
28. प्रितिकाना गोस्वामी - कला - पश्चिम बंगाल
29. राधाचरण गुप्ता - साहित्य आणि शिक्षण - उत्तर प्रदेश
30. मोददुगु विजय गुप्ता - विज्ञान आणि अभियांत्रिकी - तेलंगणा
31. अहमद हुसेन आणि श्री मोहम्मद हुसेन (दोघांनाही एकत्र) - कला - राजस्थान
32. दिलशाद हुसेन - कला - उत्तर प्रदेश
33. भिकू रामजी इदाते - समाजकार्य - महाराष्ट्र
34 सी आय आयझॅक - साहित्य आणि शिक्षण - केरळ
35. रतन सिंग जग्गी - साहित्य आणि शिक्षण - पंजाब
36 श्री बिक्रम बहादूर जमातिया सामाजिक कार्य त्रिपुरा
37 श्री रामकुईवांगबे जेने सोशल वर्क आसाम
38 श्री राकेश राधेश्याम झुनझुनवाला (मरणोत्तर) व्यापार आणि उद्योग महाराष्ट्र
39 श्री रतन चंद्र कार औषध अंदमान आणि निकोबार बेटे
40 श्री महिपत कवी कला गुजरात
41 श्री एम एम कीरावानी कला आंध्र प्रदेश
42 श्री आरीस खंबाट्टा (मरणोत्तर) व्यापार आणि उद्योग गुजरात
43 श्री परशुराम कोमाजी खुणे कला महाराष्ट्र
44 श्री गणेश नागप्पा कृष्णराजनगरा विज्ञान आणि अभियांत्रिकी आंध्र प्रदेश
45 श्री मागुनी चरण कुआंर कला ओडिशा
46 श्री आनंद कुमार साहित्य आणि शिक्षण बिहार
47 श्री अरविंद कुमार विज्ञान आणि अभियांत्रिकी उत्तर प्रदेश
48 श्री डोमर सिंह कुंवर कला छत्तीसगड
49 श्री रायझिंगबोर कुर्कलांग कला मेघालय
50 कु. हिराबाई लोबी समाजकार्य गुजरात
51 श्री मूळचंद लोढा सामाजिक कार्य राजस्थान
52 कु. राणी मचाय्या कला कर्नाटक
53 श्री अजय कुमार मांडवी कला छत्तीसगड
54 श्री प्रभाकर भानुदास मांडे साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र
55 श्री गजानन जगन्नाथ माने समाजकार्य महाराष्ट्र
56 श्री अंतर्यामी मिश्रा साहित्य आणि शिक्षण ओडिशा
57 श्री नाडोजा पिंडीपापनहल्ली मुनिवेंकटप्पा कला कर्नाटक
58 प्रा. (डॉ.) महेंद्र पाल विज्ञान आणि अभियांत्रिकी गुजरात
59 श्री उमाशंकर पांडे समाजकार्य उत्तर प्रदेश
60 श्री रमेश परमार आणि कु. शांती परमार (दोघांनाही एकत्र) कला मध्य प्रदेश
61 डॉ. नलिनी पार्थसारथी मेडिसिन पुडुचेरी
62 श्री हनुमंत राव पसुपुलेती औषध तेलंगणा
63 श्री रमेश पतंगे साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र
64 कु. कृष्णा पटेल कला ओडिशा
65 श्री के कल्याणसुंदरम पिल्लई कला तामिळनाडू
66 श्री व्ही पी अप्पुकुट्टन पोडुवल सोशल वर्क केरळ
67 श्री कपिल देव प्रसाद कला बिहार
68 श्री एस आर डी प्रसाद स्पोर्ट्स केरळ
69 श्री शाह रशीद अहमद कादरी कला कर्नाटक
70 श्री सी व्ही राजू कला आंध्र प्रदेश
71 श्री बक्षी राम विज्ञान आणि अभियांत्रिकी हरियाणा
72 श्री चेरुवायल के रमन इतर - कृषी केरळ
73 कु. सुजाता रामदोराई विज्ञान आणि अभियांत्रिकी कॅनडा
74 श्री अब्बारेड्डी नागेश्वर राव विज्ञान आणि अभियांत्रिकी आंध्र प्रदेश
75 श्री परेशभाई राठवा कला गुजरात
76 श्री बी रामकृष्ण रेड्डी साहित्य आणि शिक्षण तेलंगणा
77 श्री मंगला कांती रॉय कला पश्चिम बंगाल
78 कु. के सी धावरेमसांगी कला मिझोरम
79 श्री वाडीवेल गोपाळ आणि श्री मासी सदैयान *(दोघांनाही एकत्र) सामाजिक कार्य तामिळनाडू
80 श्री मनोरंजन साहू औषधी उत्तर प्रदेश
81 श्री पतायत साहू इतर - कृषी ओडिशा
82 श्री ऋत्विक सन्याल आर्ट उत्तर प्रदेश
83 श्री कोटा सच्चिदानंद शास्त्री कला आंध्र प्रदेश
84 श्री संकुरथरी चंद्रशेखर समाजकार्य आंध्र प्रदेश
85 श्री के शनाथोईबा शर्मा क्रीडा मणिपूर
86 श्री नेकराम शर्मा इतर - कृषी हिमाचल प्रदेश
87 श्री गुरचरण सिंग स्पोर्ट्स दिल्ली
88 श्री लक्ष्मण सिंग समाजकार्य राजस्थान
89 श्री मोहन सिंग साहित्य आणि शिक्षण जम्मू आणि काश्मीर
90 श्री थौनाओजम चाओबा सिंग सार्वजनिक व्यवहार मणिपूर
91 श्री प्रकाश चंद्र सूद साहित्य आणि शिक्षण आंध्र प्रदेश
92 कु. नेइहुनुओ सोरी कला नागालँड
93 डॉ. जनुम सिंग सोय साहित्य आणि शिक्षण झारखंड
94 श्री कुशोक ठिकसे नवांग चंबा स्टॅनझिन इतर - अध्यात्मवाद लडाख
95 श्री एस सुब्बरामन इतर - पुरातत्व कर्नाटक
96 श्री मोआ सुबोंग कला - नागालँड
97 श्री पालम कल्याण सुंदरम सामाजिक कार्य तामिळनाडू
98 कु. रवीना रवी टंडन कला महाराष्ट्र
99 श्री विश्वनाथ प्रसाद तिवारी साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश
100 श्री धनिराम टोटो साहित्य आणि शिक्षण पश्चिम बंगाल
101 श्री तुला राम उप्रेती इतर - कृषी सिक्कीम
102 डॉ. गोपालसामी वेलुचामी औषध तामिळनाडू
103 डॉ. ईश्वर चंदर वर्मा मेडिसिन दिल्ली
104 कु. कुमी नरिमन वाडिया कला महाराष्ट्र
105 श्री कर्म वांगचु (मरणोत्तर) सामाजिक कार्य अरुणाचल प्रदेश
106 श्री गुलाम मुहम्मद झाझ कला जम्मू आणि काश्मीर
 
पद्म पुरस्कार काय आहेत?
सैन्य दलांमध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्यांना Gallantry Awards म्हणजेच शौर्य पुरस्कार दिले जातात. 
 
भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि पद्म पुरस्कार हे सरकारतर्फे दिले जाणारे Civilian Honours म्हणजे नागरी सन्मान आहेत. विविध क्षेत्रांत असमान्य कार्य करणाऱ्या नागरिकांना हे पुरस्कार दिले जातात. 
पद्म पुरस्काराचे 3 प्रकार-
 
पद्म विभूषण
पद्म भूषण
पद्मश्री
पद्म विभूषण पुरस्कार हा भारतरत्नच्या नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान मानला जातो.
 
पद्म पुरस्कारांचा इतिहास काय?
1954 मध्ये हे पद्म पुरस्कार द्यायला सुरुवात झाली आणि आजवर फक्त 1978, 1979, 1993 आणि 1997 मध्ये पद्म पुरस्कार देण्यात आले नाहीत. 
 
भारतातला प्रत्येक नागरिक या पुरस्कारांसाठी पात्र आहे. धर्म, लिंग, जात, हुद्दा, वय याची कोणतीही आडकाठी नाही… अपवाद म्हणजे सरकारी नोकरी करणारे, PSUs मध्ये काम करणारे कर्मचारी. 
 
ते या पुरस्कारांसाठी पात्र ठरत नाहीत. पण या नियमातही काही अपवाद आहे. सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांना मात्र हे पुरस्कार दिले जातात.
 
परदेशी नागरिकांनाही हे पुरस्कार दिले जाऊ शकतात. 
 
एखाद्या व्यक्तीला एक पद्म पुरस्कार देण्यात आल्याच्या किमान 5 वर्षांनंतर पुन्हा दुसरा पद्म पुरस्कार दिला जाऊ शकतो. 
 
दरवर्षी जास्तीत जास्त 120 पद्म पुरस्कार दिले जाऊ शकतात. यामध्ये मरणोत्तर पुरस्कार, आणि NRI, परदेशी नागरिक म्हणजे फॉरिनर्स आणि Overseas Citizens of India म्हणजे परदेशात राहणाऱ्या भारतीयांना देण्यात आलेल्या पुरस्कारांचा समावेश नसतो.
 
 पद्म पुरस्कारांची निवड प्रक्रिया काय?
2015 पर्यंत फक्त राज्यांचे मंत्री, मुख्यमंत्री, गव्हर्नर, खासदारच या 'पद्म' पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करू शकत होते. पण 2015 मध्ये हा नियम बदलत ही प्रक्रिया खुली करण्यात आली. 
 
पुरस्कारांची ही नामांकन प्रक्रिया सर्वांसाठी खुली आहे आणि यामध्ये Self Nomination सुद्धा केलं जाऊ शकतं. म्हणजे तुम्ही स्वतःचं नावही सुचवू शकता, असं पद्म पुरस्कारांच्या अधिकृत वेबसाईटवर म्हटलंय.
 
याशिवाय सरकारी पदांवरील व्यक्ती - मुख्यमंत्री, राज्य सरकार किंवा खासदारही कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तीचं नाव सुचवू शकतात.
1 मे ते 15 सप्टेंबरच्या कालावधीत साधारणपणे ही नामांकन केली जातात. यानंतर पद्म पुरस्कार समिती या सगळ्यांमधून अंतिम नावांची निवड करते. भारताचे पंतप्रधान दरवर्षी पद्म पुरस्कार समितीची स्थापना करतात. ही समिती पुरस्कारांसाठीची नावं सुचवते. कॅबिनेट सचिव या समितीचे प्रमुख असतात. आणि या समितीत गृह सचिव, राष्ट्रपतींचे सचिव आणि 4 ते 6 नामवंतांचा समावेश असतो. 
 
ही समिती काही नावं पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे recommend करते आणि अंतिम मंजुरी या दोघांकडून मिळते.
Published By -Smita Joshi