शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 2 जानेवारी 2022 (10:30 IST)

परदेशी देणगी स्वीकारणाऱ्या 6000 सामाजिक संस्थांची नोंदणी रद्द

परदेशी देणगी घेणाऱ्या 6000 संस्थांची नोंदणी 1 जानेवारीपासून रद्द झाली आहे. यापैकी काही संस्थांनी परदेशी देणगी नियमन (एफसीआरए) परवाना नूतनीकरण केलं नसेल, किंवा त्यांचे अर्ज फेटाळले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, भारतीय लोक प्रशासन संस्था, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय), इमॅन्युएल हॉस्पिटल असोसिएशन, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, आयआयटी दिल्ली यासह इतर संस्थांचा समावेश आहे.
एफसीआरए कायद्यानुसार सामाजिक संस्थांना (एनजीओ) ही नोंदणी करणं अनिवार्य असतं. जवळपास 5789 संस्थांनी नुतणीकरणच केलं नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
यासाठीची नोंदणीची मुदत संपण्याआधी संस्थांना परवाना नुतणीकरण करण्याबाबत सूचना पाठवण्यात आल्या होत्या. तरी अनेक संस्थांनी अर्ज केले नाही त्यामुळं त्यांची परवानगी रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे.