शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

चंद्राबाबू नायडू थोडक्यात बचावले

आंध्र प्रदेशमध्ये एक मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये ४ भाविकांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. यातील जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे थोडक्यात बचावले आहेत. 
 
राज्यातील कडपा जिल्ह्यात रामनवमी निमित्त काढलेल्या मोठ्या मिरवणुकीदरम्यान एक मांडव कोसळला. अचानक सुरु झालेला सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे हा मंडप कोसळला. त्यानंतर काही क्षणांत येथे मोठा गोंधळ निर्माण झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली. 
 
पोलिसांच्या माहितीनुसार, कडपा जिल्ह्यातील वोंटिमिटा येथील कोडनड्रमा स्वामी मंदिरात रामनवमीनिमित्त कार्यक्रम सुरू असताना मंडप कोसळल्याची दु्र्घघटना घडली. रामनवमीनिमित्त आयोजित या उत्सवात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी यावेळी आपल्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांसोबत येथे हजेरी लावली होती. दरम्यान, मंडप पडल्याने लोकांमध्ये मोठी गोंधळ निर्माण होऊन चेंगराचेंगरी झाली. यातून चंद्राबाबू नायडू देखील थोडक्यात बचावले. दरम्यान, जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.