शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जुलै 2023 (19:10 IST)

Cheetah : कुनोमध्ये आज पुन्हा आठव्या चित्ता 'सूरज'चा मृत्यू झाला

मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ता प्रोजेक्ट प्रकल्पाला मोठा धक्का बसला असून  शुक्रवारी आणखी एका आफ्रिकन चित्ताचा मृत्यू झाला. गेल्या चार महिन्यांत जीव गमावणारा हा 8 वा आफ्रिकन चित्ता आहे.गेल्या पाच महिन्यात 5 मोठ्या आणि 3 लहान चित्त्याचा मृत्यू झाला आहे. 

कुनो नॅशनल पार्कमध्ये आज (14 जुलै) सकाळी आफ्रिकन चित्ता सूरज मृतावस्थेत आढळून आला. सूरजच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
याआधी मंगळवारी (11 जुलै) आणखी एक नर चित्ता तेजस मृतावस्थेत आढळला होता. तेजसच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर, त्याच्या पोस्टमार्टम अहवालात असे दिसून आले होते की तो 'आंतरिकदृष्ट्या कमकुवत' होता आणि मादी चितेसोबत झालेल्या हिंसक झुंजीत तो जखमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला.

70 वर्षांनंतर चित्ता देशात परतले, जेव्हा 17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून 8 चित्ते सोडले. यावर्षी 18 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतील आणखी 12 चित्ते कुनोमध्ये सोडण्यात आले. म्हणजे एकूण 20 चित्ते आणण्यात आले होते. सध्या कुनोच्या पार्कमध्ये 15 मोठे तर 1 लहान चित्त्याचं पिल्लू असून ते सर्व स्वस्थ आहे. 
 
Edited by - Priya Dixit