शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 8 जानेवारी 2022 (16:00 IST)

माजी आयपी एस अधिकारी किरण बेदींनी पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले ,डीजीपी, डीएम कुठे होते?

माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केला आहे. पंतप्रधान पंजाबमध्ये असताना डीजीपी, डीएम कुठे होते, असा सवाल त्यांनी केला. हे षडयंत्र आहे का, असा सवाल ही त्यांनी केला. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत किरण बेदी यांनी विचारले की, "सुरक्षेचा पहिला भंग डीजीपीची अनुपस्थिती होती. राज्याचे गृहमंत्री आणि गृह सचिवही उपस्थित नव्हते. जिल्हा दंडाधिकारीही गैरहजर होते. सुरक्षेतील त्रुटी हा पूर्वनियोजित कट होता का? "होते का? हे पंतप्रधानांवर घातपाताचे स्पष्ट प्रकरण आहे."
यूपीचे माजी डीजीपी प्रकाश सिंह यांनीही पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या उल्लंघनावर पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्याच्या पोलिसांवर विश्वास ठेवता येत नसेल, तर कोणावर करायचं? माजी डीजीपी म्हणाले, "दोष पंजाब पोलीस आणि पंजाबमधील राजकीय नेतृत्वाच्या अधिकार्‍यांवर जाईल. पंतप्रधानांना सुरळीत रस्ता न देण्याचे कोणतेही औचित्य असू शकत नाही. जर आम्ही राज्य पोलिसांवर विश्वास ठेवू शकत नाही तर आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा. ."
काय घडले ?
 बुधवारी पीएम मोदी पंजाब दौऱ्यावर होते. यादरम्यान भटिंडा विमानतळावरून हुसैनीवाला हुतात्मा स्मारकाकडे जाणारा पंतप्रधानांचा ताफा 20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकून पडला होता. या ताफ्याला रोखण्याची जबाबदारी एका शेतकरी संघटनेने घेतली असली, तरी यादरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी असल्याचे सांगत पंजाब सरकारकडून अहवाल मागवला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.