सोमवार, 5 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (15:30 IST)

पिकनिकसाठी गेलेल्या विद्यार्थिनीवर मित्रांकडूनच गँगरेप

मानवता आणि मैत्रीसारख्या पवित्र नात्याला कलंक फासणारं प्रकरण मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून समोर आले आहे. जिथे एक विद्यार्थिनी तिच्या 4 मित्रांसह सहलीसाठी गेली होती. मग मित्रांनी पीडितेला कोल्ड ड्रिकमध्ये मादक पदार्थ मिसळून पिण्यास दिलं आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
 
पीडिता प्रियकरासोबत हँग आउट करण्यासाठी मांडूला गेली होती
खरं तर, 23 ऑगस्ट रोजी 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी तिचे तीन मित्र आशिष, निपुल आणि रितेश आणि एक मैत्रिणीसह कारमध्ये मांडू या पर्यटन शहरात गेले होते. या दरम्यान, पिकनिक साजरी करून परतत येताना, एका तरुणाने तिला कोल्ड ड्रिक दिलं ज्यात मादक पदार्थ मिसळेलं होतं. नंतर नशेच्या अवस्थेत आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. असे म्हटले जाते की तीन तरुणांपैकी एक मुलीचा प्रियकर होता.
 
बलात्कार केल्यानंतर रस्त्यावर सोडून पळून गेले 
तिन्ही मित्रांनी हॉटेलवर मुलीसोबत बेशुद्ध अवस्थेत सामूहिक बलात्कार केला. असे म्हटले जाते की या वेळी पीडितेची एक मैत्रीण देखील उपस्थित होती. चार जणांनी पीडितेला बेशुद्ध अवस्थेत सोडून पळ काढला.
 
कुटुंब आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली
दुसऱ्या दिवशी बुधवारी, पीडितेने तिच्या कुटुंबासह इंदूरच्या लसुडिया पोलिस स्टेशनमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. पीडितेने पोलिसांना सांगितले की, ती 23 ऑगस्ट रोजी सकाळी तिची मैत्रीण पूजा आणि मित्र आशिष, निपुल आणि रितेशसह मांडूला निघाली होती. परतत येताना दुपारी 4 वाजता आशिषने कोल्ड्रिंक पाजलं. ते प्यायल्यावर मी बेशुद्ध झाले. रात्री 10 वाजता जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा असे दिसून आले की मी एका हॉटेलच्या खोलीत आहे. मी डोळे उघडताच मला दिसले की निपुल माझ्याबरोबर चुकीच्या गोष्टी करत आहे आणि माझे कपडे दूर पडलेले आहेत. या प्रकरणाचा तपासही आरोपींना अटक करू शकलेला नाही. त्यांच्या शोधात पोलीस ठिकठिकाणी छापे घालत आहेत.