रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (11:18 IST)

दिल्लीच्या रस्त्यांवर सुप्रिया यांचे सायकलिंग

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनासाठी राज्यातील अनेक नेते दिल्लीत दाखल झाले आहे. हिवाळी अधिवेशनाबरोबरच दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचीही जोरदार चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातील अनेक नेते दिल्लीमध्येही एकमेकांच्या संपर्कात आहेत. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे अचानक चर्चेत आल्या आहेत. या चर्चेचे कारण आहे त्यांची सायकलवारी.
 
सुप्रिया सुळे यांनी बुधवारी सकाळी दिल्लीच्या रस्त्यांवर सायकल चालवली. सुळे यांचा सायकल चालवण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचे स्वेटर आणि कानामध्ये हेडफोन्स घालून सुळे सायकल चालवताना दिसत आहेत. सुळे यांनी ट्विटरवरुनही लोकसभा सचिवालयातील सेवक असणार्‍या चावीलाल या व्यक्तीबरोबरचा सायकलवरील फोटो पोस्ट केला होता.
 
लोकसभेत आम्हाला योग्य पद्धतीने काम करता यावे म्हणून अनेक लोक कष्ट घेतात, असे सुळे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.