सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 22 डिसेंबर 2022 (21:05 IST)

नाशिकच्या विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा

Nashik Airport
नाशिकच्या विमानतळाने आता एअर कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी नाईट लँडिंगची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे नाशिकच्या विमानतळावरून सध्या एकच सेवा सुरु आहे. अन्य एअर कंपन्यांच्या सेवा बंद आहे. त्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे नुकताच या विमानतळाच्या दुरुस्तीसाठी विमानतळ पंधरा दिवस बंद ठेवण्यात आले होते. तर आता एअर कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी नाईट लँडिंगची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
नाशिकच्या विमानतळावर गेल्या काही महिन्यांपासून उड्डाण घेणाऱ्या एअर कंपन्यांच्या सेवा बंद आहे. त्यामुळे विमान सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक विमानसेवा बंद झाल्या आहे. याचा परिणाम प्रवाशांची संख्या घटून सरळ व्यवसायावर झाला आहे. त्यानंतर विमानतळाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि पंधरा दिवस विमानसेवा बंद ठेवण्यात आली. त्यानंतर नवी धावपट्टी उभारण्याचा निर्णयही घेतला. आता विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना नाशिककडे आकर्षित करण्यासाठी एअरोनॉटिकल तसेच नॉन-एरोनॉटिकल शुल्कात एचएएलने मोठी सवलत जाहीर केली असून, ऑपरेशनच्या सुरुवातीच्या काळात रात्री मोफत पार्किंगची सवलत दिली आहे. त्यामुळे नजिकच्या काळात नाईट लँडींग सेवा पुरवली जाणार आहे. 
 
विमानतळ सुरक्षा वाढवण्यासाठी टर्मिनल बिल्डिंग, एटीसी, रनवे आणि पार्किंग ऍप्रन इत्यादींचा समावेश असलेल्या संपूर्ण एरोड्रोम परिसरात सर्व सीसीटीव्ही कॅमेरे अत्याधुनिक तंत्रज्ञान डिजिटल सिस्टीमसह बदलण्याची एचएएलद्वारे योजना तयार करण्यात येत आहे. एअर कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी नाईट लँडिंगची आणि रात्रीची मोफत पार्किंगची सुविधा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor