शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 19 मे 2021 (20:34 IST)

26 मे रोजी संध्याकाळी चंद्र आकाशात मोठा आणि तांबूस दिसेल,दिल्ली,मुंबई आणि चेन्नईत दिसणार नाही

पूर्व दिशेला 26 मे रोजी संध्याकाळी संपूर्ण चंद्रग्रहणानंतर आकाशात एक दुर्मिळ आणि मोठा तांबूस रंगाचा सुपर ब्लड मून दिसेल. एम.पी.बिर्ला प्लॅनेटेरियमचे दिग्दर्शक आणि प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ देबिप्रसाद दुआरी यांनी बुधवारी सांगितले की, कोलकातामधील शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण 10 वर्षांपूर्वी 10 डिसेंबर 2011 रोजी दिसून आले होते.
दुआरी म्हणाले की, 26 मेच्या रात्री सूर्य, पृथ्वी आणि चंद्र सरळ रेषेत असणार की पृथ्वी वरून हे चंद्रग्रहण दिसेल आणि काही काळ ग्रहण लागेल. पृथ्वीभोवती फिरत असलेला चंद्र काही क्षण पृथ्वीच्या सावलीतून जाईल आणि ते पूर्णपणे ग्रहण होईल.
संपूर्ण चंद्रग्रहण पूर्व आशिया, पॅसिफिक महासागर, उत्तर व दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या बहुतेक भागांतून दिसून येईल. चंद्राचे  अर्ध ग्रहण दुपारी 3.15 च्या सुमारास प्रारंभ होईल आणि संध्याकाळी 6.22 वाजता समाप्त होईल.
भारतातील बहुतेक भागात पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान चंद्र पूर्व क्षितिजाच्या खाली असेल आणि म्हणूनच देशातील लोकांना पूर्ण चंद्रग्रहण दिसणार नाही.
परंतु काही भागांमध्ये, पूर्व भारतातील बहुतेक भागांमध्ये लोक चंद्रग्रहणाचा शेवटचा भागच बघू शकतील,ते देखील पूर्वेच्या  आकाशाच्या भागात जेव्हा चन्द्र जवळून निघत असेल.  
ते म्हणाले की, संध्याकाळी 6 :15वाजता कोलकातामध्ये चंद्र बाहेर येईल आणि इच्छुकांना काही मिनिटांसाठी अर्ध चंद्रग्रहणाची झलक मिळेल, ते  संध्याकाळी .6 :22 वाजता संपेल. दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमधील लोकांना हे ग्रहण दिसणार नाही.