सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (22:00 IST)

उत्तर प्रदेश: 16 वर्षीय मुलीने विनयभंगाचा निषेध केल्यावरआरोपीने तिला सॅनिटायझर पाजले, मुलीचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे विनयभंगाला विरोध केल्याने16 वर्षीय तरुणीला काही तरुणांनी सॅनिटायझर पाजले. या मुळे मुलीचा मृत्यू झाला. उद्देश राठोड असे या आरोपीचे नाव आहे.  
 
 27 जुलै रोजी इयत्ता 11वीची एक विद्यार्थिनी शाळेतून घरी परतत असताना उदेश राठोड या आरोपीने तिला अडवले आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, उदेशसोबत आणखी तीन तरुण देखील  होते. विद्यार्थिनीने विनयभंगाचा निषेध केल्यावर तिला सॅनिटायझर पिण्यास भाग पाडले.पीडितेच्या भावाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी त्याचा व्हिडीओही बनवला आणि सोशल मीडियावर अपलोड केला.  
 
सॅनिटायझर प्यायल्यानंतर मुलीची प्रकृती बिघडली आणि तिला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालात जे काही तथ्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी मृतदेह रस्त्यावर टाकून आरोपींना अटक करण्याची मागणी करत आंदोलन केले. यामुळे वाहतूक दोन तास ठप्प झाली होती .   प्रशासनाकडून योग्य कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह उचलला. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत.  
 
 
Edited by - Priya Dixit