शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 19 जुलै 2023 (20:35 IST)

आम्ही ‘वंदे मातरम्’ म्हणू शकत नाही…; आझमींच्या वक्तव्यावरुन विधानसभेत घमासान

आम्ही वंदे मातरम म्हणू शकत नाही, असं वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी विधानसभेत केलं. आझमींच्या या वक्तव्यावरुन सभागृहात घमासान झालं. आमदारांनी आक्रमक होत वेलमध्ये येऊन आझमींविरोधात घोणाबाजी केली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.
 
सभागृहात लक्षवेधीचा मुद्दा मांडताना आझमी म्हणाले, एक आफताब पुणवला होता, त्याने मुलीची हत्या केली आणि तिच्या धडाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर मुस्लिमांविरोधात देशात रोष तयार झाला. हिंदू समाजाचे मोर्चे निघू लागले. या मोर्चांमध्ये मुस्लिमांना एवढं अपमानित करण्यात आलं की मुस्लिमांपेक्षा देशदोही दुसरे कोणीच नाही.
 
आणखी एका घटनेत 29 मार्चला सायंकाळी 5 वाजता औरंगाबादमध्ये तीन लोक राममंदिराजवळ दुचाकीवरुन आले. त्यांनी ‘इस देश मे रहेना है, तो वंदे मातरम् कहना होगा’ अशा घोषषा दिल्या. अध्यक्ष महोदय आम्ही वंदे मातरम् म्हणू शकत नाही. कारण आम्ही फक्त अल्लाहला मानतो. जगात कोणासमोरही आम्ही डोकं टेकवू शकत नाही. आईसमोरही आम्ही डोकं टेकत नाही. आमचा धर्म याची अनुमती देत नाही. तिथे तरुणांनी या घोषणा दिल्यानंतर परिस्थिती बिघडली.