रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (12:06 IST)

वर्गात घुसून मुलीवर हल्ला वर

Crime
पुण्यातील वडगाव शेरी येथे एका माथेफिरू तरुणाने वर्गात घुसून मुलीवर चाकूने हल्ला केला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सकाळी 11 वाजता घटना घडली त्यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सुरू होता. आरोपी तरुण हातात चाकू घेऊन विद्यार्थिनीच्या दहावीच्या वर्गात घुसला. आरोपीने इतर विद्यार्थ्यांच्या समोर आणि शिक्षिकेच्या समोरच या मुलीवर सपासप वार केले. त 
 
 शहरातील रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या मुलीची प्रकृती स्थिर आहे.  विद्यार्थिनीला पालकांच्या मदतीने तातडीने वडगाव शेरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आरोपी तरुण दहावीच्या मुलीवर वार केल्यानंतर घटनास्थळाहून पसार झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पालक मोठ्या संख्येने जमले आहेत.  याप्रकरणी शास्त्रीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत