रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (11:51 IST)

आता वाहतुकीच्या प्रलंबित गुन्ह्यांवर दहापट दंड

एका नवीन नियमाचा वाहन चालकांना मोठा फटका बसणार आहे. आता वाहतूक गुन्ह्यांसाठी ऑनलाइन दंड प्रलंबित असलेल्या वाहनचालकांना दहापट अधिक दंड भरावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार प्रलंबित ई-चालानवरही नवीन दंड आकारण्यात येणार आहे. 
 
अर्थात लायसन्सशिवाय वाहन चालवल्यास पाचशे रुपयांचा दंड प्रलंबित असेल तर त्याऐवजी पाच हजार रुपये भरावे लागतील. नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्यांतर्गत याबाबद राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. 
 
या अंतर्गत नियम- 
हेल्मेट न घातल्यास 500 रुपयांच्या दंडासह तीन महिन्यांसाठी परवाना रद्द
विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्या चालकाचा परवानाही तीन महिन्यांसाठी रद्द
वाहनाचा नंबर किंवा फॅन्सी नंबर प्लेट, रिफ्लेक्टर किंवा टेललाइटमध्ये छेडछाड केल्याबद्दल 1,000 रुपयांच्या दंड
 
सर्व गुन्ह्यांसाठी पहिल्या गुन्ह्यासाठी 500 रुपये आणि दुसर्‍या गुन्ह्यासाठी 1,500 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
 
हेल्मेट न घातल्यास दंडात वाढ झालेली नाही पण राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या प्रकरणात प्रकरणात पहिल्यांदा दंड 500 रुपये आणि तीन महिन्यांसाठी परवाना रद्द करण्यात येणार असून दुसरा गुन्हा आढळल्यास संबंधित व्यक्तीला 1500 रुपये भरावे लागतील.
 
शहरात एकापेक्षा जास्त गुन्ह्यांसाठी प्रलंबित दंडांची संख्या सर्वाधिक असून त्यात प्रामुख्याने हेल्मेट न घालण्याच्या दंडाचा समावेश आहे.