शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (22:44 IST)

हतनूरचे १४ दरवाजे उघडले; तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

उत्तर मध्य महाराष्ट्रात 21 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने नंदुरबार येथील  हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. तापी नदीपात्रात 40 हजार 894 क्युसेक विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 
पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी 1 वाजता सारंगखेडा प्रकल्पाचा 1 दरवाजा पूर्ण क्षमतेने उघडून 17 हजार 20 क्युसेक्स व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचा 1 दरवाजा पूर्ण उघडून 13 हजार 222 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पुढील 72 तासात सदर प्रकल्पाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी दोन्ही प्रकल्पातून विसर्ग वाढविण्यात येईल. तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.