सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (23:43 IST)

आणंदमध्ये रेल्वे स्टेशनजवळ वंदे भारत ट्रेनने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू

गुजरातमध्ये वंदे भारत ट्रेनला आणखी एका अपघाताची भर पडली आहे. आणंद येथील रेल्वे स्थानकाजवळ एका 54 वर्षीय महिलेचा रेल्वेची धडक बसून मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीट्रिस आर्चीबाल्ड पीटर असे महिलेचे नाव आहे. ती स्टेशनजवळ ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर वंदे भारत ट्रेनने धडक दिली. मंगळवारी दुपारी 4.37 वाजता ही घटना घडली. वंदे भारत हा गाडी गांधीनगर स्टेशनवरून मुंबई सेंट्रलकडे जात होती. ही गाडी आणंद स्थानकावर थांबत नाही. 
 
पोलिसांनी सांगितले की, पीटर हा गुजरातमधील अहमदाबादची  रहिवासी असून ती आणंद येथे आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी आली होती. रेल्वेने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 
 
विशेष म्हणजे वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 सप्टेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवला होता. गेल्या महिनाभरातच या गाडीचे तीनवेळा गुरे आदळून नुकसान झाले आहे.
 
Edited by - Priya Dixit