शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (09:46 IST)

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ,ईडीकडून लूकआउट नोटीस जारी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर ईडीने अनिल देशमुख यांना पाच वेळा समन्स बजावले आहे.तरी ही ते ईडीसमोर एकदाही हजर झाले नाही. 
 
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, 100 कोटी वसुली प्रकरणातील आरोपी आहे.अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना लूकआऊट नोटीस जारी केली आहे,त्यानंतर ते देशाबाहेर जाऊ शकणार नाही.
 
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता.त्यांच्या वर पोलिस अधिकाऱ्यांचा गैरवापर, खंडणी आणि बदली-पोस्टिंगमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे.अंमलबजावणी संचालनालय या प्रकरणाचा तपास करत आहे. 100 कोटींच्या वसुलीची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने पाच वेळा समन्स पाठवले आहेत.
 
अनिल देशमुख यांना आतापर्यंत पाच वेळा समन्स जारी केले आहेत, परंतु ते एकदाही ईडीसमोर हजर झाले नाहीत.सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता.आता त्यांच्या विरोधात लूकआउट नोटीस जारी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 
 
वकील आणि सीबीआय निरीक्षकांना अटक करण्यात आली आहे
तपासादरम्यान सीबीआयचा अहवाल लीक केल्याप्रकरणी सीबीआयचे उपनिरीक्षक यांनाही अटक करण्यात आली आहे.त्यांनी देशमुख यांचे वकीला कडून लाच घेतल्याचे उघड कीस झाले.त्यांना ही या प्रकरणात सामील असल्यामुळे अटक करण्यात आली आहे. देशमुखांच्या अटकेसाठी ईडीने अनेक ठिकाणी छापेही घातले आहेत. आता ईडीने त्यांच्या विरोधात 'लूकआऊट' नोटीस जारी केली आहे.