शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (15:20 IST)

शिवसेना ज्येष्ठ नेते रामदास कदम, आमदार योगेश कदम यांना मोठा धक्का

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांना हटवून, तात्काळ त्यांच्या पदांवर शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्यात. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांना मोठा झटका बसला आहे.
 
शिवसेनेत पक्षाशी गद्दारी करणार्यांना जागा नाही, हे पुन्हा एकदा शिवसेना पक्ष प्रमुखांनी ठामपणे दाखवून दिल्याचीही चर्चा सध्या शिवसेनेत सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्या निवडणुकांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र भाजप विरोधात लढतील. या संदर्भात शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्थानिक खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्याशीही चर्चा झाल्याची माहीती मिळत आहे.
 
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या 
- राजू निगुडकर उपजिल्हाप्रमुख, उत्तर रत्नागिरी
 
- किशोर देसाई, विधानसभा क्षेत्रप्रमुख, दापोली विधानसभा
 
- ऋषिकेश गुजर, तालुकाप्रमुख, दापोली तालुका
 
- संतोष गोवले, तालुकाप्रमुख, मंडणगड तालुका
 
- संदीप चव्हाण, शहरप्रमुख, दापोली शहर
 
- विक्रांत गवळी, उपशहरप्रमुख, दापोली शहर