शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 मार्च 2024 (09:35 IST)

बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी

ajit pawar
राष्ट्रवादीने लढण्याबाबत महायुतीत निर्णय झाल्यास सुनेत्रा अजित पवार या राष्ट्रवादीच्या बारामतीतील उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी  दिली.
 
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेचे चार आमदार आहेत. त्यामुळे ही जागा पक्षाने लढवावी, अशी मागणी या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली. मात्र या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान केंद्रीय मंत्री भारती पवार आहेत. भाजपामध्ये  प्रवेश करण्यापूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होत्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबईत लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलवली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिंडोरी, नाशिक, धाराशिव, हिंगोली, ईशान्य मुंबई, रायगड या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांनी वरील माहिती दिली.

Edited by -Ratnadeep Ranshoor