रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मार्च 2019 (09:26 IST)

डेक्कन क्वीनच्या प्रवाशांची 30 मिनिटे वाचणार

मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा तास लवकर पोहोचणार आहेत. डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये नवीन लिंक होमन-बुश (एलएचबी) रेकचा वापर करण्यात येणार आहे. यामधील पुश अँड पुल या तंत्रज्ञानामुळे दोन्ही प्रवासाचे अंतर 30 ते 35 मिनिटांनी कमी होणार आहे. तसेच, येत्या काही महिन्यात हे नवीन रेक जोडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 डेक्कन क्वीनला जोडण्यात येणार्‍या या तंत्रामुळे या प्रवाशांना चांगलाच फायदा होणार आहे. सध्या डेक्कन क्वीन पुण्याहून सकाळी 7.15 वाजता सुटून मुंबई सीएसएमटीला 10.25 वाजता पोहोचते. तसेच, मुंबईहून संध्याकाळी 5.10 वाजता निघणारी डेक्कन क्वीन पुण्याला रात्री 8.25 वाजता पोहचते. मात्र पुश अँड पुल या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचे किमान 30 मिनिटे वाचणार आहेत.