सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (07:35 IST)

डॉन अरुण गवळीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

‘डॅडी’ या नावाने प्रसिद्ध असलेले अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या अरुण गवळी नागपूर कारागृहात आहेत. त्याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहे. गवळीसमवेत 5 कैद्यांना लागण झाल्याने नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ माजली आहे.
 
गेल्या 2 ते 3 दिवसांपासून गवळीची प्रकृती बरोबर नव्हती. याबाबत तुरुंग अधिकाऱ्यास माहिती सांगण्यात आली होती. त्यानंतर गवळी व इतर कैद्यांची ‘कोरोना’ टेस्ट करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. तुरुंग प्रशासनाने या सर्वांना स्वतंत्र बॅरेकमध्ये ठेवले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निगराणीत उपचार सुरू आहेत. नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात 2012 साली गवळीसह 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 
 
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जुलै महिन्यात अरुण गवळीला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली होती. त्याच्या काही दिवस आधीच अरुण गवळी पॅरोलची रजा पूर्ण करुन नागपूर कारागृहात परतला होता. अरुण गवळी हा यापूर्वी 8 वेळा कारागृहातून बाहेर आला आहे.