शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 डिसेंबर 2021 (08:20 IST)

अखेर 'त्या' वादग्रस्त वक्तव्याबाबत मंत्री गुलाबराव पाटलांनी मागितली माफी

शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत प्रचार भरसभेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं 'माझ्या मतदारसंघातील रस्ते हे हेमा मालिनीच्या गालासारखे केले असल्याचं ते म्हणाले होते.  
त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावरती भाजपकडून जोरदार टीका सुरु होतीच शिवाय, 'गुलाबराव पाटील यांनी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून गुलाबराव पाटील यांनी केलेले विधान करणे हे निषेधार्ह' असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर  यांनी म्हटलं होतं तसंच पाटील य़ांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं असा इशारा देखील चाकणकर यांनी दिला होता.
दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवरती अखेर मंत्री गुलाबराव पाटील यांनी मागितली माफी मंत्री गुलाबराव पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. भाषणातील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो असं गुलाबराव पाटील म्हणाले.
 
ज्यात आता नगरपंचायत निवडणुकीचा धुरळा उडालेला असताना जळगावमध्ये शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका विधानानं नव्या वादाला तोंड फुटलं. जळगावमध्ये आयोजित जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना रस्त्यांची तुलना थेट ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांच्या गालांशी केली . गुलाबरावांच्या या विधानानंतर राज्याचं राजकारण तापलं आहे. राज्याच्या विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी गुलाबराव पाटील यांच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.
गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरं जावं असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. गुलाबराव पाटील यांनी जळगावात एका प्रचारसभेत आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यावर खडसे यांनीही पाटील यांना प्रत्युत्तर देताना मतदारसंघात काम केलं म्हणूनच ४० वर्ष निवडून येतोय असं म्हटलं आहे.