शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जानेवारी 2022 (15:27 IST)

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले राजीनामा देण्याच्या मनस्थितीत

फोटो साभार -सोशल मीडिया 
ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असून डिसले यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.अमेरिकेत शिष्यवृत्ती मिळाली असून त्यासाठी त्यांना तेथे जाण्यासाठी रजा हवी आहे. मात्र, शिक्षण विभागाकडे अर्ज करूनही रजा मंजूर होत नसल्याने डिसले गुरुजी वैतागले आहेत. शिक्षक म्हणून काम करणार मात्र जिल्हा परिषद शिक्षक नोकरीचा राजीनामा देण्याची मनस्थिती आहे. शिक्षण विभाग व प्रशासकीय व्यवस्था त्रास देत असल्याने व्यथित झाल्याने लवकरच निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.
 
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. तब्बल सात कोटी रक्कमेचा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक असून जगभरातील 140 देशांतील 12 हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून डिसले गुरुजींची निवड करण्यात आली आहे.