शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 डिसेंबर 2021 (08:27 IST)

नववर्षाच्या तोंडावर मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी; दारुच्या दरात घट

विशेष उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात करण्याची राज्य सरकारने नुकतीच घोषणा केली होती. उत्पादन शुल्क विभागाने नियम बदलल्यामुळे काही ब्रँडचे दर कमी झाले आहेत. व्हिस्की, रम, ब्रँडी, जिन आणि वोडकासाठी उत्पादन शुल्कात ही कपात लागू झाली आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने नव्या वर्षासाठी नवे मद्याचे दर जाहीर केले आहेत.
नव्या वर्षाच्या आधीच हा नवा साठा दुकानांमध्ये विक्रीसाठी आल्यास ख्रिसमस व नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मद्यप्रेमींना दारू स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकेल. राज्यात शुल्क कपात लागू झाली असली तरी दुकानातील मद्याचा जुना साठा असल्याचे तो जुन्या किमतीला विकला जात आहे. त्यामुळे स्वस्त दरात दारू उपलब्ध झालेली नाही. मात्र येत्या काही दिवसांमध्ये दारूच्या दुकानांमध्ये नवा साठा नव्या किमतीसह उपलब्ध होणार आहे.