रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (16:20 IST)

दोषी आढळेल त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल : जयंत पाटील

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराजवळ स्फोटकांसह गाडी सापडली. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेला आहे. एनआयए त्यांच्याकडील माहितीच्या आधारे तपास करत आहे. या तपासांतर्गत एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली आहे. तसेच सचिन वाझे यांना पोलीस खात्यातूनही दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले आहे. तपास यंत्रणा प्रकरणाची चौकशी करत आहे. हा तपास सुरु असताना कोणत्याही मंत्र्यांने बोलणे चुकीचे आहे. तपासात जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर योग्य कारवाई  करण्यात येईल. असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
 
या प्रकरणात जे कोणी अधिकारी दोषी आढळतील त्यांना महाराष्ट्र सरकरा पुर्णपणे प्रायश्चित्त दिल्याशिवाय राहणार नाही असा आमचा विश्वास आहे. असेही वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
 
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणातही अशाच प्रकारे उलट सुलट चर्चा झाली. त्या प्रकरणातही पोलिसांनी योग्य कारवाई केली होती. पालघर साधू हत्याकांड प्रकरणातही पोलिसांनी योग्य कारवाई करत दोषींवर कारवाई केली होती. तसेच सचिन वाझे प्रकरणातही योग्य कारवाई होईल. सरकार कोणाला पाठीशी घालणार नाही. इतर प्रकरणातही सरकारने कोणाला पाठीशी घातले नव्हते आणि आताही पाठीशी घालणार नाही असेही जयंत पाटलांनी म्हटले आहे.
 
शरद पवारांच राज्य सरकारच्या आदेशांमध्ये हस्तक्षेप असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोणत्याही निर्णयात किंवा प्रकरणात मध्यस्थी करत नाहीत. पक्ष म्हणून आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून कोणी जर सल्ला मागितला तर ते देत असतात या अर्थ त्यांचा या सरकारमध्ये हस्तक्षेप आहे असे म्हणण्यात काही तथ्य नाही. परंतु वाझे प्रकरणात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा केली हे माहीती नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील.