शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

तकऱ्यांच्या लेकींचे आंदोलन सरकारला हद्दपार करणार - जयंत पाटील

शेतकरी संपाचे गाव म्हणून महाराष्ट्रातील पुणतांबा ओळखले जाते. पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांच्या लेकींनी चार दिवसांपूर्वी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या लेकींचे हे आंदोलन सरकारला सत्तात्याग करायला भाग पाडेल, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

बुधवारी, तिसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला. तर शालेय विद्यार्थीनींनी काळे झेंडे हाती घेऊन सरकाविरोधी निषेध रॅली काढली. राज्यभरातून महिला आणि शेतकरी या मुलींना पाठिंबा देण्यासाठी पुणतांबा येथे दाखल होऊ लागले आहेत. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही पुणतांब्यात येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दीड वर्षांपूर्वी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्याचा निषेध करण्यासाठी पुणतांब्याच्या शुभांगी, पूनम आणि निकिता जाधव यांनी सरकारविरोधात हा एल्गार पुकारला आहे. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. तीन दिवसानंतरही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला या आंदोलनाची दखल घेण्यास वेळ मिळालेला नाही.