सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 एप्रिल 2024 (21:42 IST)

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा अवधूत दरेकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२३मधील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत दरेकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. महिला प्रवर्गातून आश्लेषा जाधव यांनी राज्यात पहिला, तर मागास प्रवर्गातून कोल्हापूरच्या रोहित बेहेरे यांनी पहिला क्रमांक मिळवला.

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य कर निरीक्षक संवर्गातील १५९ पदांचा अंतिम निकाल उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला. उमेदवारांच्या माहितीसाठी परीक्षेचा अंतिम निकाल, प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (कटऑफ) एमपीएससीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले.

Edited By - Ratnadeep Ranshoor