शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 डिसेंबर 2020 (08:21 IST)

राज्यात कमी- अधिक प्रमाणात थंडी, विदर्भात मात्र थंडीची लाट

राज्याच्या बहुतांश भागांतील रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या जवळ असल्याने कमी-अधिक प्रमाणात थंडी आहे. विदर्भात मात्र सर्वच ठिकाणी तापमान सरासरीखाली गेल्याने काही भागांत थंडीच्या लाटेची स्थिती आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
 
उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये सध्या थंडीची लाट आहे. त्याचा परिणाम राज्यावर होत असून, गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली आहे. राज्यातील हवामान कोरडे आहे. त्याच वेळेला समुद्रात चक्रीय वाऱ्यांची स्थिती कार्यरत आहे. या परिस्थितीत तापमानात काही प्रमाणात चढ-उतार कायम आहेत.  त्यामुळे विदर्भातील काही भागातही थंडीच्या लाटेची स्थिती निर्माण झाली. 
 
मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर वगळता इतरत्र किमान तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक असल्याने काही प्रमाणात थंडी जाणवत आहे.  कोकण विभागातही रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे.