शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (20:52 IST)

दोनशेहून अधिक उत्तर भारतीय नागरिकांनी हाती घेतला मनसेचा झेंडा

maharashatra navnirman sena
उत्तर भारतीय वस्तीचे मोठे ठिकाण असलेल्या डोंबिवली पूर्व विभागातील सागाव चेरानगर भागातील दोनशेहून अधिक उत्तर भारतीय नागरिकांनी मनसेचे ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांच्या उपस्थित मनसेमध्ये प्रवेश केला.सागाव परिसर हा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अनेक वर्ष या भागातून शिवसेनेचा नगरसेवक कल्याण डोंबिवली पालिकेत निवडून जातो.
 
शिवसेनेतील फुटीनंतर सागाव भागातील उत्तर भारतीयांना आपल्या गटात खेचण्यासाठी दोन्ही शिवसेनेकडून प्रयत्न सुरू असतानाच अचानक येथील उत्तर भारतीय नागरिकांनी मनसेत प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.
 
हिंदुत्वाचा जयजयकार करत या नागरिकांना मनसेचे झेंडे देण्यात आले. मनसे कार्यालयात हा कार्यक्रम करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही हे पक्षप्रवेश करत आहोत, असे उत्तर भारतीय संघटनेचे पदाधिकारी, नागरिकांनी सांगितले.

Edited By -Ratnadeep Ranshoor