रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 (19:24 IST)

Mumbai : पोलिसांनी 40 वर्षांनी गुन्हेगाराला अटक केली

arrest
असं म्हणतात की गुन्हेगाराचा गुन्हा कधीच लपून राहू शकत नाही. असाच एक सराईत गुन्हेगार पोलिसांना गेल्या 40 वर्षा पासून चकमा देत होता. पोलिसांनी त्याला अखेर बेड्या घातल्या. सय्यद ताहेर सय्यद हासिम असे या आरोपीचे नाव आहे. हत्येच्या प्रयत्न केल्या प्रकरणी 1982 मध्ये सय्यद ला कोर्टाने दोषी ठरवले होते. त्याला पेरोलवर सोडले असून तो परतलाच नाही. अखेर 1985 साली कोर्टाने त्याला फरार घोषित केले.

त्याच्या शोध घेऊन देखील तो सापडला नाही. डोंगरीच्या हा फरार असलेला वॉन्टेड आरोपी पोलिसांनी अटक केल्याचे शुक्रवारी घोषित केले. त्याच्या विरोधात स्थायी वॉरंट जारी केल्यावर त्याला पकडण्यासाठी पोलिसानी पथक तयार केले. त्याच्या बद्दल माहितीमध्ये डोंगरी या भागात त्याचे घर आहे अशी माहिती होती. इतर अजून काहीच माहिती नव्हती. इतर लोकांची चौकशी केल्यावर पोलिसांना एक सुगावा मिळाला त्याच्या आईच्या मृत्यूनंतर तो इराणी शिया मुस्लिम असल्याने कब्रस्तानमध्ये जाऊ शकतो. ही माहिती पाच वर्षे जुनी असल्यामुळे पोलीस अधिक तपास करत होते. 
सय्यद हैद्राबाद असल्याची माहिती मिळाली. त्याचे ठिकाण कुठे आणि फोन नंबर ही माहिती पोलिसाना एका खबरीने दिली. 

पोलिसांनी या माहितीवरून त्याचे लोकेशन शोधले आणि पोलिसांच्या पथकाने पाळत ठेवत त्याच्या हालचालीकडे लक्ष ठेवले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला हैद्राबादच्या घरातून  त्याला अटक केली. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो कधी गुलबर्गा, कधी तेलंगणा येथे राहत होता. सय्यद हा अंडरवर्ल्ड आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंगशी संबंधित अनेक गुन्हेगारीच्या कामात सामील होता. त्याला शुक्रवारी पोलिसांना अटक करण्यात यश मिळाले. त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असून त्याला न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. 
 
 Edited by - Priya Dixit