सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 मे 2022 (09:28 IST)

सुप्रिया सुळे : 'नरेंद्र मोदींनी एवढ्या संस्था विकल्या, पण आम्हाला विचारतात 60 वर्षांत काय केलं'

supriya sule
"नरेंद्र मोदी यांनी एवढ्या संस्था विकल्या, पण ते आम्हाला विचारतात की आम्ही 60 वर्षांत काय केलं, तेच विकून तर तुम्ही सरकार चालवत आहात," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
 
परभणीच्या सोनपेठमध्ये आयोजित बालविवाह प्रतिबंध जागृती अभियान महिला परिषद तथा कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

"गरीबांना मोफत सिलेंडर देतो म्हणून इतरांची सबसिडी काढून घेतली. ना गरिबांना सिलेंडर दिले, ना इतरांना. महिलांना मोदींच्या धोरणामुळे पुन्हा चुलीकडे वळावं लागलं. यांचा फोटो असतो पेट्रोल पंपावर. मोदींना फक्त जाहिरातबाजी करता येते," असं सुळे म्हणाल्या.